Posts

http://dinanathmangeshakar.blogspot.in ऋणनिर्देश      आपण केलेले कार्य पूर्ण करण्यासाठी हजारो लोकांच्या  मदतीचे हात त्या कार्यास लागलेले असतात आणि आपण केवळ एक माध्यम असतो ; ते कार्यपूर्ण करणारे असे माझे मत आहे. प्रत्येक चांगल्या कार्याच्या पाठीशी अनेकांचे प्रोत्साहन व  सहकार्य मिळालेले असते . प्रबंधाच्या लेखणासाठी विषय निवडणे , त्यासाठी आवश्यक ते संदर्भ साहित्य गोळा करणे , त्याची योग्य पद्धतीने रचना करणे , या सारख्या अनेक गोष्टी मला या प्रबंध लेखणाच्या निमित्ताने शिकता आल्या. एम.ए. पदवी परीक्षेसाठी सादर केलेल्या शोध निबंधात मला अनेक आदरणीय व्यक्तिकडून जे सहकार्य , प्रोत्साहन मिळाले त्याबदल मी त्यांची शतश: ऋणी आहे.      माझ्या मार्गदर्शिका डॉ. ईला वेद मॅडम (प्राध्यापिका) आणि इतिहास प्रमुख एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई , यांनी आपल्या जबाबदारीचे काम सांभाळून आत्मियतेने व प्रेमाने वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाशिवाय हा शोधनिबंध पूर्ण होणे अवघड होते. त्यामुळे मी संशोधिका त्यांची मनपूर्वक अत्यंत...